हिवरा आश्रम – विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या व्हालीबॉल संघाची राज्यस्तरावर निवड झाली. वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे पार पडलेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगट मुलींच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात यवतमाळ संघाला पराभूत करत विवेकानंद विद्या मंदिराच्या मुलीच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची राज्य स्तरासाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत ईशा सुनिल धोंडगे, प्रतिक्षा पवार, शिवानी पाटील, खुशी पिठले, रजनी शिंगणे, ऐश्‍वर्या जाधव, समृद्धी पवार, प्रतिक्षा तुळशीराम पवार, साक्षी रहाटे, शुभांग जवंजाळ, संजीवनी जवंजाळ, संजना मोहरुत यांचा समावेश आहे.

या यशस्वी खेळाडूंची तयारी क्रीडा शिक्षण रणजित जाधव, आत्मानंद थोरहाते, गोविंद अवचर, शाम खरात यांनी करुन घेतली. संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव गोरे, सहसचिव विष्णूपंत कुलवंत, सहसचिव आत्मनंद थोरहाते, पुरुषोत्तम आकोटकर, मुख्याध्यापक अणाजी सिरसाट, उपमुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे, पर्यवेक्षक आत्माराम जामकर, अशोक गिर्‍हे यांनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.