कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात मानव विकास कल्याण मिशन अंतर्गत विवेकानंद विद्या मंदिरातील इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या २५ विद्यार्थींनींना २५ सायकलचे खा प्रतापराव जाधव व आमदार डाॅ.संजय रायमूलकर यांच्याहस्ते मंगळवार ता. ५ रोजी मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. विवेकानंद विद्या मंदिरात इयत्ता 8 वी मध्ये शिकणा-या ब्रम्हपूरी,दुधा,रायपूर व हिवरा बु या गावातील विद्यार्थीनींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य कैलास भिसडे तर प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रतापराव जाधव,आ.डाॅ.संजय रायमूलकर,माजी जि.प.सदस्य मनिष शेळके,शिवसेना तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळुकर,विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके,उपसरपंच मधुकर शेळके,माजी उपसरपंच सौ.मालता वडतकर,उपप्राचार्य अशोक गिहे,पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम जामकर,अंगणवाडीच्या पर्यवेक्षक सौ.अंजली देशमुख यांच्यासह पालक मंडळी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुचित दिवटे यांनी तर आभार प्राचार्य कैलास भिसडे यांनी केले.