कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे सिध्दहस्त धन्वंतरी होते. डोंगर द-यातून पायीचालत जाऊन आदिवासी व दुर्गम भागातील रूग्णांची तसेच मुंबई, नागपूर अशामहानगरातून आरोग्य सेवेचे केंद्र स्थापून त्यांनी सुमारे सव्वा कोटीहून अधिक रूग्णांनानिरोगी जीवन बहाल केले आहे. शुकदास महाराजांच्या रुग्णसेवेमुळे आश्रमाचा नावलौकिक देशभर झाला असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे यांनी बोलतांना केले.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विवेकानंद आश्रमात आरोग्य तपासणी व औषधीवाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शनिवारी ता.७ रोजी ते बोलत होते.
विवेकानंद आश्रमात दि.७ एप्रिल रोजी आरोग्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातआश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे यांनी रूग्णांची तपासणी केली. शिव भावेजीव सेवेचा मंत्र अंगिकार लाखो रूग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे कर्मयोगी संतप. पू. शुकदास महाराज यांनी शेवटच्या श्वासा पर्यंत रूग्णसेवा करून सव्वा कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त केले. ७ एप्रिल हा आरोग्य दिन जगभर साजरा करण्यातयेतो.
पुढे बोलतांना डॉ.गि-हे म्हणाले की, कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या पश्चात विवेकानंद आश्रमाचा आरोग्य विभाग तेवढयाच तत्परतेने व सेवाभावाने रूग्णांची सेवाकरीत आहे. महाराजांसारखा डॉक्टर पुन्हा होणे नाही. योग्य निदान व उपचार ही महाराजांची वैशिष्ट होती. वैद्यकिय क्षेत्रातील सखोल ज्ञान व रूग्णालाच देव मानून त्याचीसेवा करणारे महाराज वयाच्या ७४ व्या वयापर्यंत काम करणारे एकमेव डॉक्टर असतील.वैद्यकिय सेवेने व्यवसायाचे रूप धारण न करता. सेवेचे अधिष्ठाण हा या क्षेत्राचा पायाअसला पाहिजे. रूग्णसेवेसाठी डॉक्टरांनी सदैव उपलब्ध असायला हवे. असेही त्यांनी पुढेबोलतांना सांगीतले.
यावेळी फार्मासिस्ट सुनिल ठेंग,प्रमोद थोरहाते,सोपान वायाळ,आत्माराम दळवी इत्यादीहोते. यावेळी रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी करण्यात आली.

शुकदास महाराजांनी रूग्णांत देव शोधला
मी कथा करणारा महाराज नसून व्यथा दूर करणारा महाराज आहे. माझ्या हातूनसर्वसामान्य माणसाची पिडा दूर व्हावी,त्याचे जीवन आनंदी बनावे हे सर्व करण्यासाठीमंदिरात जाण्याची गरज नसून माझ्या समोर आलेला रोगी हेच माझे दैवत आहे. हामहाराजांचा सेवाभाव व त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन होता.

उन्हाळयात आरोग्याची काळजी घ्या.
उन्हाळयाच्या दिवसात जनतेने स्वच्छ व निर्जंतुंक भरपूर पाणी प्यावे. शक्यतो उन्हात जाणेटाळावे. उन्हात गेल्यास सुती कपडयाचा वापर करावा. बाजारात मिळाणा-या केमिकल्सयुक्त कोल्ड्रिंक ऐवजी लिंबू सरबत,ताक,आंब्याचे पन्हे,ऊसाचा रस इत्यादी प्यावे. ऊनलागल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.