गीत रामायनाने हिवरा नगरी मंत्रमुग्ध,संस्कार भारती कलाकारांचे सादरीकरण

श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती…सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी… उगा कां काहिज माझें उले? पाहूनी वेलीवरची फुलें…. दशरथा घे हें पायसदान तुझ्या यज्ञ मी प्रगट जाहलें हा माझाासन्मान…दाने प्रहरीं का ग शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला ग सखी राम जन्मला…रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त जाहले…आकाशीशीं जडले नातें धरणीमातेचे स्वयंवर झालें सीतेचे…राम चालले तो तर सत्पथ थांबसुमंता थांबवि रे रथ… दैवजात दुःख भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…यासारखी एकापेक्षा एक सरस गीतरामायणातील गीतांनी हिवरा आश्रम येथील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर स्वरप्रभू सुधीर फडके व महाराष्ट्राचे वाल्मिकी ग दि माडगूळकर जन्मशताब्दीनिमित्त संस्कार भारती चिखली परिवाराच्या वतीने गुरूवारी ता.३ रोजी गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात श्रीराम,स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
संस्कार भारती विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य महेश वाधवाणी, चिखली शाखेचे अध्यक्षा सौ.ज्योतीताई भवर,उपाध्यक्षा सौ गौरी ठोसर,सचिव श्री निळकंट अवटी,मार्गदर्शक.सौ कविता लंके यांच्या मार्गदर्शनखाली संस्कारभारतीच्या चमूने विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर गीतरामायणाचे सादीकरण केले.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांच्या हस्ते संस्कार भारतीच्या पदाधिकारी,गायक वृंदाचा सत्कारकरण्यात आला. या कार्यक्रमात सौ. ज्योती भवर,सौ. गौरी ठोसर.निळकंठ आवटी.सौ .कविता लंके.अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे,सौ.मनीषा बोंद्रे, सौ.माधुरी विद्वांस,सौ निलमा कुलकर्णी,डॉ. श्रीनिधी राजे,अशोक जैन,सौ.आरतीसकळकळे, नितीन सकळकळे,सौ.अनिता कुलकर्णी,सौ. राजश्री देशपांडे,सौ. मुक्ता भालेराव, सौ. मुग्धा खेकाळे,कु.स्वरा खेकाळे, कु.पूनम तांबोळे, कु अनुराधा तांबोळे, श्रुती कुलकर्णी यांनी सुमधूर गीते सादर केली. कार्यक्रमयशस्वीतेसाठी विवेकानंद आश्रमाचा संगीत विभाग व संस्कार भारती चिखली चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला हार्मोनियम राजेंद्र डांगे तर तबला शशीकांत उदावंत यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संतोष गोरे,सुत्रसंचालन ज्योतीताई भंवर तर आभार प्रदर्शन यांनी केले.

विदर्भाच्या ५१ गावात सादरीकरण
गेल्या १५ वर्षापासून संस्कार भारतीच्या वतीने गीतरामायणांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे.यावर्षी सुधीर फडके व गदिमा जन्मशताब्दीनिमित्त विदर्भातील एकुन ५१ गावात १५१ दिवशी नृत्यमय गीत-रामायण सादरहोणार असून १००० गायक, वादक, नृतिका, व सह कलावंत हजेरी लावणार आहेत.