युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांच्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, कर्तव्याची जाण यातुनच सामाजिकदृष्टया परिवर्तन होत असते. युवकांनी समाजामध्ये सकारात्मक योगदान देवून करावे. युवकांनी सामाजिक परिवर्तनात पुढाकार घ्यावा असे विचार जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिध्दी  येथे दि. ६ मार्च रोजी बोलतांना काढले.

येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहली दरम्यान राळेगण सिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून उभे केलेले मानवसेवेचे कार्य समाजोन्नतीचे आहे. विवेकानंद आश्रम हा भावी पिढीसाठी दिपस्तंभ आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या आठवणींनी ते यावेळी भावूक झाले होते. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राळेगण सिध्दी गावाचा इतिहास, पूर्वीची स्थिती, त्यानंतर अण्णांच्या मागदर्शनात झालेला गावाचा विकास तथा विविध विषयांवर यावेळी विद्यार्थ्यांशी दिलखुल्लास चर्चा केली.  यावेळी प्रा. मनोज मु-हेकर, प्रा.जयप्रकाश सोळंकी, प्रा. कु.समता कस्तुरे, प्रा.पल्लवी मिटकरी, प्रा.मनिषा कुडके, प्रा.गजानन गायकवाड, प्रा. अमोल शेळके, प्रा. किशोर गवई, प्रा. गजानन ठाकरे, प्रा. योगेश काळे तथा आदि हजर होते.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहली दरम्यान राळेगण सिद्धी या गावाला भेट दिली. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

महाराजांच्या आठवणींनी भावूक

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून उभे केलेले मानवसेवेचे कार्य समाजोन्नतीचे आहे. विवेकानंद आश्रम हा भावी पिढीसाठी दिपस्तंभ आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या आठवणींनी ते यावेळी भावूक झाले होते.