हिवरा आश्रम – विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी संत प पू. शुकदास महराज यांची 75 जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी पूजनीय महाराजश्रींच्या पालखीची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या वक्तृत्व स्पर्धेत जिल्हाभरातून विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींन सहभाग घेतला. त्यानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सुमारे 1300 रुग्णांनी नेत्रतपासणी केली. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय बुलडाणा येथे ऑपरेशन करुन मिळेल असेही डॉ.प्रेमचंद पंडीत यांनी या शिबीरात नेत्रतपासणी सोबत हिमोग्लोबीन, कॅल्शियम, युरीक अॅसिड, मधुमेह इत्यादी तपासणीही करण्यात आली.
या शिबिरात डॉ.प्रशांत दिवठाणे, डॉ.संजय राठेड, डॉ.सुजाता भराड मॅडम, विवेकानंद आश्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गिर्हे, नेत्रचिकित्सा अधिकारी सवडतकर खिल्लारे, जावेद ठेकिया या तज्ञांनी आपली मोफत सेवा देवून रुग्णांची सेवा केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर, शशिकांत बेंदाडे, अॅड. किशोर धोंडगे, प्रशांत हजारी, अशोक गिर्हे, गजानन ठाकरे, प्रा.कैलास भिसडे, पुरुषोत्तम आकोटकर, यांच्यासह प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.अनुप शेवाळे, अण्णाजी सिरसाट, प्रा.मनोज मुर्हेकर, माजी विश्वस्त मा.बा.केंदळे, दयानंद केंदळे, प्रमोद थोरहाते, विजय ठोकरे, विश्वंभर शेळके, आत्माराम जामकर, मुख्याध्यापिका सुनिता गोरे तथा आश्रमाचे आजी माजी पदाधिकारी यांनी यावेळी परिश्रम घेतले.
Recent Comments