कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे थाटात उदघाटन

रासेयो शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक सेवेचे संस्कार केले जातात. रासेयो शिबीरातून शिबिरार्थी विध्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, श्रमसंस्कार, मूल्याधिष्ठीत जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते. रासेयो सामाजिक उपक्रमांची प्रेरणा असल्याचे विचार विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे यांनी रासेयो शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उदघाटन प्रसंगी सोमवारी दत्तक ग्राम लव्हाळा येथे ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,संत गाडगे बाबा,डॉ.पंजाबराव देशमुख,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पुलवामा येथील आतंकवादी भ्याड हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच चोरपांग्रा येथील शहिद नितीन राठोड व मलकापूर येथील शहिद संजय राठोड यांना देखील श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,विश्वस्त प्रा.गजानन ठाकरे,ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय काळे,तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश लहाने,शुभम लहाने,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संतोष लध्दड तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकी तिडके,अनिकेत कड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.गजानन ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश इरतकर,प्रा.प्रतिक उगले,प्रा.रवींद्र काकड,प्रा.मीनाक्षी कडू व विवेकानंद कृषी महाविद्यालय,विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.