श्रीराम कथेच्या प्राचीनतेमुळे आणि सौदर्यामुळे ही कथा प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय आहे. श्रीराम कथेत भक्तीचे दर्शन दिसून येते. श्रीरामकथेतून पितृ आज्ञेचा संदेश मिळतो. जो मनाला रमवितो तो राम. श्रीराम कथेने देशाच्या आणि काळाच्या सीमा ओलांडल्या आहे. रामाच्या चरित्राने मनुष्याला कठीण प्रसंग सामोरे जाण्याला शिकविले. श्रीराम कथेत बंधुप्रेमाचे अदभूत दर्शन घडते असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी दि. ११ एप्रिल रोजी पहिल्या दिवशी श्रीराम कथेत भाविकांसमोर बोलतांना केले.
श्रीराम कथेसाठी आलेल्या भाविकांनी मंडपात तुडूंब गर्दी केली होती. तीन दिवस चालणा-या या रामकथा सोहळयाचा प्रारंभ कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या समाधीचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलतांना रामराव महाराज ढोक म्हणाले की, श्रीराम कथा संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण ग्रंथ आहे. संतांकडे आशीर्वाद मागावा लागत नाही. संतांची कृपादृष्टीचा लाभ महत भाग्याने मिळते. कर्मयोगी संत प. पू.शुकदास महाराजांनी आपल्या सेवाकार्यामुळे या परिसराचे नंदनवन केले. शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम सारख्या खेडया शिक्षण,आरोग्य व आध्यात्माचा त्रिवेणी संगम घडवून आणला. शुकदास महाराजाच्या जाण्याने भक्तगण पोरके झाले आहेअसेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी हजारो भाविकांच्या उपस्थितीने पहिल्या दिवशी विक्रमी गर्दी केली. कथेनंतर रात्री ८ ते १० ह.भ.प. अनिरुध्द महाराज क्षिरसागर यांचे हरीकीर्तन संपन्न होणारअसल्याचे आश्रम सुत्रांनी सांगीतले. कथेसाठी दुर-दुरुन आलेल्या भाविकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत केली असल्याचेही यावेळी आश्रम सुत्रांनी सांगीतले.

शुकदास महाराज समाधी सोहळयास प्रारंभ
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संजीवन सोहळ्यास दि १० एप्रिल पासून सुरुवात झाली. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी व हा अद्भुत संजीवन समाधी सोहळा आपल्या नेत्राने पाहण्यासाठी राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने विवेकानंद आश्रमात दाखल झाला आहे. भक्तांच्या मांदियाळीने विवेकानंद आश्रम परिसर फुलन गेला आहे.

शुकदास महाराजांच्या सहवासाने परिसर पुनीत
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रींचे जीवन त्यांच्या कार्याच्या रुपाने सदैव प्रेरणादायी राहणार आहे. त्यांनी निर्माण केलेल्या या परिसरात होत असलेली रामकथा मनाला व चित्ताला आनंद देणारी आहे. हा परिसर संतांच्यासहवासाने पुनीत झालेला असल्यामुळे या परिसरात आलेल्या माणसात परिवर्तन होते असे ह.भ.प. ढोक महाराजांनी पुढे बांलतांना सांगीतले.

कथा मंडपात कुलरची सोय
आज कथेचा दुसरा दिवस असल्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ होऊ शकते त्यामुळे कथेसाठी येणा-या भाविकांनी वेळेवर येवून आपले स्थान ग्रहन करावे भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भव्य मंडपाची व्यवस्थाकरण्यात आली असून मंडपात ठिकठिकाणी कुलर लावण्यात आलेले आहेत सोबतच आरोच्या शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.