कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या शैक्षणिक संस्थेत कार्य करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयामध्ये उभे केलेले सेवाकार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. विवेकानंद आश्रमाच्या संस्कारांनी घडलो असे विचार विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अणाजी सिरसाट यांनी सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी बोलतांना काढले.
यावेळी मुख्याध्यापक अणाजी सिरसाट व सौ. विजया सिरसाट,डॉ.विनायक सिरसाट यांचा विवेकानंद आश्रमाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते यांच्यासह विश्वस्त नारायण भारस्कर,अशोक गि-हे,पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,हभप निवृत्तीनाथ येवले,हभप विष्णु थुट्टे,ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे,माजी विश्वस्त मा.बा.केंदळे,सेवा निवृत्त केंद्र प्रमुख वसंतराव काळे, पत्रकार समाधान म्हस्के पाटील,संतोषबापू थोरहाते,सदाशिव काळे तथा आqदची यावेळी उपस्थिती होती.